लिखाळ, स्वाती, प्रियाली, अनु, नंदन
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
लिखाळ
कधी कधी इथेही कोमट कॉफी मिळते, मग त्यांना कफ्फे लात्ते काल्दो असे काहीतरी सांगावे लागते. पण आपल्या हाटेलातली काफी दिव्यच असते ;)
हल्ली बरिस्ताची फ्याशन आहे पण मी अजून गेलो नाही.
स्वाती
गंमत म्हणजे इटलीमध्ये स्टारबक्स नाही. कदाचित तोट्यात जाइल अशी त्यांना खात्री असावी ;)
प्रियाली
अरमानी म्हणजे तोच..जॉर्जिओ. याशिवाय गुची, दोल्चे-गबाना अशी इतरही श्रद्धास्थाने आहेत. सोफिया किंवा अल पचिनो हे थोडे जुने झाले असावेत. नवीन पिढी त्यांच्याविषयी फारशी बोलत नाही.
अनु
मलाही लेख लिहिताना वाटत होते की चित्रे टाकावीत. माझे बोलोन्यामधले एक स्नेही सुनील यांच्या अनुदिनीत याची सुंदर चित्रे आहेत. ती इथे बघायला मिळतील. (दुवादान देण्याची कळ गायब झालेली दिसते)
http://www.kalpana.it/eng/blog/2007/02/coffee-art.html
नंदन
स्टारबक्सचा घाव जिव्हारी लागला कारण मी माझ्या नावाला (क्षीरसागर) जागू शकलो नाही
फिल्टर कॉफीवरुन आठवले. आमच्या पुणे विद्यापीठाच्या ओल्ड कँटीनमध्ये एकदम झकास फिल्टर कॉफी मिळते.
हॅम्लेट