मधल्या काळात जरा सुट्टीवर होतो.. क्षमस्व!
इंग्रजांच्या पूर्वी भारत हा एकसंध देश कधीच नव्हता हा एक सार्वत्रिक गैरसमज इंग्रजांनी करून दिला होता
ह्यात चूक काय आहे? इतिहासाचे बघूया, पुराणातली वांगी पुराणातच राहूदेत. इंग्रजांनी ह्या सर्व राजवटींना वचक बसवला, व त्यांच्याच राज्यात भारत एक एकसंध समाज(cohesive entity) झाला, ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून कसे चालेल?
या वाक्याला माझा आक्षेप आहे. किंबहुन बहुश्रुत मनोगतींकडून असला प्रतिवाद वाचल्यावर मला खरेतर आतून विषण्ण वाटले.मी केवळ पुराणातील उदा. दिली असा काहींचा आक्षेप आहे,
नामदेवांचे अभंग शीख आवडीने गातात, एक मराठी राजा काशीविश्वेश्वराला मुक्त करण्याची शपथ घेतो, एखाद्या महात्म्याला चंपारण्यात सत्याग्रह करावा वाट्तो...
ही उदाहरणे पुराणातील आहेत का? अगदी अलिकडचे , १८५७ च्या स्वातंत्र्यसमाराचेच उदाहरण घेऊ या. नानासाब पेशवा, बहादूरशा, राणी लक्श्मीबाई, तात्या टोपे, याना कोणत्या समान सूत्राने बांधले होते? स्वामी रामानंद तीर्थांचे ते प्रसिद्ध वाक्य "मै भारत हू, हिमालय मेरा मस्तक है, सिंध ऑर पंजाब , आसाम ओर बंगाल मेरी बाहे है......मै चलता हू तो भारत चलता हऔ...... ही वाक्ये कोणत्या देशासंदर्भात केली आहेत? आणखी पलिकडे जाऊ... तक्षशीला( सध्याचे पाकिस्तान)ला प्राचार्य असणऱ्या विष्णु शर्म्याला (आर्य चाणक्य)नंद राजाकडे बिहार मधे जाउन राजकारण करण्याची आवश्यकता का वाट्ली?
मेक्याले शिक्षण पद्धतीत शिकलेल्या आम्हां सर्वाना आमचा इतिहास पराभवाचाच वाटतो.. तो दोष आमचा की इंग्रजांचा? काळाच्या कसोटीवर तर "आर्य" बाहेरून आले, त्यांनी एत्तदेशीयांना हुसकून लावले हा निवळ्ळ भ्रम आहे आणि राज्यकारभारच्या सोईसाठी आणि इथल्या लोकांचे नैतिक खच्चीकरण करण्यासाठी हा चुकीचा इतिहास इंग्रजांनी शिकवला, हे सिद्ध झाले आहे , तरिही तोच चुकिचा इतिहास आम्ही आमच्या पुढच्या पिढिला शिकवणार ? (वाचा http://www.gosai.com/chaitanya/saranagati/html/vedic-upanisads/aryan-invasion.html )"आर्य" हा "जातिवाचक"शब्द नसून " गुणवाचक" शब्द आहे. त्यामुळे आर्य द्रविड हा भेदच मुळी कपोल्कल्पित आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे.तेव्हा मूळ मुद्दा हा की, अनादी अनंत कालापासून या द्वीपकल्पाला "भारत" अथवा "हिंदुस्थान" म्हणतात, म्हणत आले आहेत,
हिमालयंसमारभ्यं यावंहिंदुसरोवरं/ तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थान प्रचक्षते/ ( सोरी...पुन्हा पुराणात! संस्कृत शुद्दलेखन चू.भू द्या घ्या.)१५० वर्षांचा तो काळ कितीसा? पण आम्ही आमचा विश्वधर्म, स्वत्व विसरलो हे खरे! दोष इंग्रजांचा नाही, आमच्याच निलंड्पणाचा!
अस्तु, व्यक्तिगत टीका करण्याचा, दुखावण्याचा मुळीच हेतु नाही.
वर्तमान स्थितीत भारतीयांना देशाभिमान नाही, असे म्हणणे थोडे अतिरेकी ठरेल.. परदेशात गेल्यावर( विशेषतः अमेरीकेत) तिथल्या नसलेल्या / तुटपुंज्या इतिहासाची, संस्कृतीचा अभिमान बाळगणारी माणसे पाहून भारतीय आता आपल्या इतिहासाकडे वळू लागली आहेत.( यात अमेरिकन लोकांचा अपमान करण्याचा हेतू नाही, ३००-४०० वर्षापूर्वीचा अमेरीकेचा इतिहास म्हणजे निव्वळ रानटी टोळ्यांचा इतिहास आहे ) तेव्हा वर्तमान स्थिती अगदीच वाईट नाही. केवळ भौतिक प्रगती म्हणजे प्रगती नव्हे! हे पाश्चिमात्यांकडून आम्ही शिकू लागलो आहोत. परीस्थिती आशादायक आहे ...!
भारताने पोखरण चाचणी घेतली तेव्हा ती शांततामय वातावरणासाठी, भारताने बांगलादेश मुक्तीसाठी हल्ले केले ते स्वतःच्या संरक्षणासाठी व अमेरिकेने आता इराकवर हल्ला केला, इराण-सीरियावर हल्ला करण्याची धमकी दिली ती साम्राज्यवादी व हुकूमशाही प्रवृत्तीतून हा फरक योग्य आहे का?
भारताने केलेली अणुचाचणी ही केवळ प्रतिक्रीया होती.अमेरिकेच्या दादागिरिला सडेतोड उत्तर.... "न भय देत काहू को. ना भय जानत आप" या न्यायाने! तशी साम्राज्यवादी प्रवृत्ती असती तर लाहोर पासून केवळ ६ कि.मी वर असलेले भारतीय सैन्य शास्त्रीजींनी परत बोलोवले नसते आणि हाता-तोंडाशी आलेला बांग्लादेश आम्ही गिळला नसता का? भारताने मुक्त केलेला बांग्लादेश आणि अमेरीका व्याप्त अफगाणिस्तान यात तुम्हाला काहीच फरक दिसत नाही का?
भारतीयांनी दगडात, मातीत, झाडात, पाण्यात परमेश्वर पाहिला मात्र आपल्याचसारख्या हाडामांसाच्या माणसांत भारतीयांना वर्षानुवर्षे दिसला नाही - अद्यापही दिसत नाही हे शाश्वत, विशाल व सर्वसमावेशक मूल्य आहे का?
दोष माणसांचा आहे.. मूल्यांचा नाही. स्टीफन कोवेच्या भाषेत Principles are like lighthouses, we break against the lighthouse and not the lighthouse ! गांधीजी, अरबिंदो, विवेकानंद,गाड्गे बाबा यांनी परमेश्वर चराचरात पाहिला. अगदी अलिकडे , बाबा आमटे, अभय बंग यांनाही तो दिसला.पाश्चिमात्याण्च्या अंधानुकरणाच्या लाटेत सामान्य भारतीय हरवला आहे. पण बदल घडेल.̱...̱घडतो आहे... पेला अर्धा रिक्त की अर्धा भरलेला आहे आपण ठरवायचे आहे!