फुलाला ... असे म्हटल्यामुळे भावे प्रयोगाप्रमाणे चुरलेस का रे? असे म्हणणे अनिवार्य आहे. मात्र गझलेची यमके सांभाळण्यासाठी चुरलास का हे आवश्यक आहे.

ह्यावर उपाय म्हणून भूतकाळवाचक कर्तरी प्रयोग करता येईल.

असे ..

फूल तू हे रातराणीचे असे चुरलास का रे

हे ही एकदम वाचून चुकीचे वाटेल. सकर्मक क्रियापदांना भूतकाळवाचक कर्तरी प्रयोगात वापरायची पद्धत सर्व क्रियापदांमध्ये वापरत नाही. (मात्र वापरली तर चुकीचे वाटायला नको.) उदा. पिणे ह्या क्रियापदाचे आपण असे प्रयोग करतो.

दूध हे कोजागरीला तू असे प्यालास का रे ... (कर्तरी प्रयोग ... राम दूध प्यायला. सीता दूध प्यायली.) हे ही योग्य आणि

दूध हे कोजागरीला तू असे प्यालेस का रे ... (कर्मणी प्रयोग ... तू दूध प्यायलेस. तू रस प्यायलास.) हे ही योग्य ठरावे.

अर्थात हा अधिकार कवीचा आहे. चू. भू. द्या. घ्या.