वर मी 'भावे प्रयोग असल्याने चुरलेस हे अनिवार्य आहे' असे म्हटले आहे, ते पूर्णतः बरोबर नाही. चुरणे ऐवजी भिणे हे क्रियापद घेतले तर मी काय म्हणतो ते स्पष्ट होईल.

चुरणे:

रातराणीच्या फुलाला तू असा चुरलास का रे? ... हे खटकते.
रातराणीच्या फुलाला तू असे चुरलेस का रे? ... हे खटकत नाही.

भिणे:

वाघिणीच्या त्या पिलाला तू असा भ्यालास का रे? ... हे खटकत नाही.
वाघिणीच्या त्या पिलाला तू असे भ्यालेस का रे? ... हे खटकते.

चुरणे आणि भिणे ह्या दोन क्रियापदात नेमका काय फरक आहे ते कुणा तज्ज्ञाने सांगितल्यास ह्यावर प्रकाश पडेल. कदाचित केवळ ऐकण्याच्या सवयीने असे घडत असणेही शक्य आहे. तसे असेल तर चाणक्य जर अशीच सकस साहित्यनिर्मिती नित्याने करीत गेले तर त्यांच्या अशा लेखनाचाही भविष्यात पायंडा पडेल. तसे झाले तर मग तेव्हा चुरलास हे खटकणार नाही.

चू. भू. द्या. घ्या.