रातराणीच्या फुलाला तू असे चुरलेस का रे.

 त्याने फुलाला चुरले. म्हणूनच हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे. या वाक्यात कर्ता तो आहे. त्याने म्हणताच कर्त्याची विभक्ती लक्षात येईल. तसेच  फुलाला- चतुर्थी/ द्वितीया आहे.

वाघिणीच्या त्या पिलाला तू असा भ्यालास का रे? तो पिलाला भ्याला. इथे भिणारा तो- प्रथमेत आहे

 तू या द्वितीय पुरूषी कर्त्याची प्रथमा आहे.
या वाक्यात कर्ता प्रथमेत आहे. तू भ्यालास का रे... हा कर्तरी प्रयोग आहे

दोन्ही वाक्यात राम शब्द वापरून पाहिला तर हा फरक चटकन स्पष्ट होईल. चुरणे आणि भिणे, चिरणे काही आले तरी ते कसे वापरायचे याचे नियम कायम राहतील.

रामाने फुलाला असे चुरले का रे?
राम पिलाला असा भ्याला का रे?