रचना चांगली आहे. आणखी सफाईदार करता येईल.
याद चाणक्या कुणाची? तू अशी पुसलास का रे?
चाणक्याने याद पुसली... आठवण पुसून टाकली... असे अपेक्षित असेल तर
याद चाणक्या कुणाची? तू अशी पुसलीस का रे? हे वाक्य योग्य वाटते.
सकस हा शब्द व्यक्तीनुसार बदलणारा आहे. सकस निर्मीतीसाठी व्याकरणाचे नियम जरूर गुंडाळून ठेवावे, शेवटी अशा पायंड्यांचे समर्थन करणारे असतात आणि मग व्याकरणकार येऊन तेच कसे बरोबर हे सुद्धा सिद्ध करतात. मराठी भाषेचे व्याकरण म्हणून लवचिक आहे तेच बरे आहे.