जेव्हा जेव्हा उदास असते माझे मन
तेव्हा तुलाच का आठवते माझे मन?...
उदास असताना आणखी काय करणार? तुला नाही तर आणखी कोणाला आठवणार?
आठवणींना सदैव जपते माझे मन
जुनी जखम का पुन: छेडते माझे मन?...
जपते का जखम छेडते नक्की ठरवा. पुन: चूक.
मनाप्रमाणे वागत नाही मी तेव्हा
माझ्यावरतीही का रुसते माझे मन?...
मनाप्रमाणे वागत नसल्यावर रुसणार नाही तर काय खुश होणार?
या स्वप्नांच्या मागे धावुन फसलो मी
तरिही स्वप्ने अजून बघते माझे मन...
धावुन चूक. तरिही चूक.
मनात गाणे म्हणतो, कविता रचतो मी
आनंदाने पुन: बहरते माझे मन...
ठीक. त्यात विशेष काय?
प्रेम तुझ्यावर केले आहे मनोमनी
तुझ्या चुकांना कसे विसरते माझे मन?...
प्रेम केल्यावर चुका विसरणारच ना?
स्वतःस दुखले तरी चालते मनास ह्या
विचार दुसऱ्याचा का करते माझे मन?...
ठीक. का करते?
कमाल आहे 'अजब' मनाची खरोखरी
क्षणात हसते, क्षणात रडते माझे मन...
अजब शब्दाचा वापर ठीक पण वरची ओळ भरीची वाटते बुवा.