अनु,

लेख सही आहे

"अमुक तमुक (काहीतरी अक्षर) रडा आहे" असा काफिया घ्यायचे ठरवले. 'कोरडा आहे', 'ओरडा आहे' इथवर ठीक होतं, पण पुढे डोक्यातून 'थेरडा आहे', 'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये निघायला लागल्यावर घाबरुन रद्द करुन टाकले.
"अमुक तमुक (काहीतरी अक्षर)रते आहे" अशा काफियावर आले. पण परत 'करते आहे','भरते आहे','मरते आहे','झुरते आहे','पुरते आहे','घोरते आहे','धरते आहे' याच्या आधीच्या अमुक तमुक जागा भरायला भयंकर त्रास व्हायला लागला. 'मी प्रेम करते आहे, मी तोय भरते आहे','मी खूप घोरते आहे','मी प्रेत पुरते आहे' वगैरे काहीतरी पाट्या टाकल्या असत्या तर प्रतिभावान गझलाकारांनी शाब्दिक बाण मारुन मारुन मलाच पुरायला कमी केलं नसतं.
 

हे वाचून हहपुवा  

तुझा लेख मस्त आहे, गझल जबरदस्त आहे..

तुला व्यनि करायची इच्छा जास्त आहे आणि ती रास्त आहे

पण खाण्यात माझा हस्त व्यस्त आहे आणि होते मी सुस्त आहे

पण तू असेच लिहीत जा,तुझ्या लेखांसाठीच मनोगतवर माझी गस्त आहे....(आता थांबवते नाहीतर तू त्रस्त होशील)

(ती) फुलराणी