१.मुंबईत कफ परेडच्या समुद्रात पाच कि.मी. अंतरावर कुत्रिम बेटे विकसीत करावे.तेथील भूखंडाची विक्री करून महाराष्ट्राची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता करावी आणि उरलेल्या पेश्यातून विकास योजनांना बख्खळ निधी उपलब्ध करून द्यावा.
२.दोन वर्षा पूर्वी म्हणजे साधारण २६जुल्लेच्या २००४ च्या पावसानंतर हि त्यांनी असेच विधान केले होते रेसकोर्सह मुंबईतील सरकारी मालकीच्या मोकळ्या जागांची विक्री केल्यास महाराष्ट्र चुटकीसरशी कर्जमुक्त होईल.
समुद्रात जमिनी विकून पैसा उभा करणे (कोणासाठी हे विचारू नये) ही अगदी जुनाट कल्पना आहे. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा म्हणजे साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात रु. १ - स्क्वेयर यार्ड ह्या दराने मुंबईत 'पाण्यात जमिनी' विकल्या गेल्या. तेथे पुढे लवकरच बॅकबे रिक्लमेशन नावाचे बकाल काँक्रिटचे जंगल उभे राहिले. त्यात पैसा उभा राहिलाच की!
आणि ह्या सगळ्याचा पर्यावरणाशी संबंध काय, हेही कुणी विचारू नये.
हे सगले चालायचेच हो, त्याबद्दल काय विचार करता, असे म्हणणारी मंडळी आता बहुसंख्य आहे. आपली संवेदना आता पार बोथट होऊन गेली आहे!