धन्यवाद सन्जोपराव! 'चीनी कम!' असा उल्लेख वाचुन म्हणजे मला चीनी लोक (जागतिक बाजारपेठेतुन) कमी करा आणि भारतीय येऊ द्या असा काहीतरी चित्रपट असेल असे वाटले होते! हा तर वयोमानानुसार साखर कमी असा अगदीच सुमार चित्रपट आहे! कथानक सांगितल्याबद्दल पुन्हा आभार!
'सलाम नमस्ते' हा पण असाच निर्बुद्ध सिनेमा होता. तो इथे मेलबन्र मध्ये तयार केला म्हणुन बघितला पण त्यातले इथल्या आयुष्याचे संदभ्ऱ अगदीच चुकीचे होते. उदा. नायक 'दारात आलेला' पेपर घेऊन शौचालयात जातो.... इथे पेपर तुमच्या पत्रपेटीत टाकला जातो.... असे बरेच चुकीचे संदभ्ऱ आहेत.
असो! सुमार चित्रपटांबेद्दल मनोगतींनी मनोगतींना सावध करणेच फक्त आपल्या हातात आहे!