गुरु चित्रपट आवडला नाही हे पाहून अनेक मित्र अभिषेक बच्चनचा अभिनय हा हिंदी चित्रपटांचा नवा मानदंड कसा आहे हे स्पष्ट करु पाहत होते. परंतु कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे माझे मत हे वाकडे ते वाकडेच राहिले.
गुरुला मुले होतात तेव्हा त्याने भांग पिऊन केलेल्या नृत्याचा प्रसंग हा तर सहनशक्तीचा अत्यंत कडेलोट करणारा आहे. मौनरागम-नायकन सारखे चित्रपट करणारा हाच का तो मणीरत्नम असा प्रश्न ओरडून विचारावा असे वाटत होते.
अरविंद स्वामी, अभिषेक बच्चन, माधवन अशा दगडांना शेंदूर थापून त्यांचा म्हसोबा करण्याची दुर्बुद्धी मणीरत्नमला होण्याचे काय कारण असावे बरे?