या डबा चित्रपटांचा आणि फ्लॉप शोचा सिनेमागृहात शुट आऊट चालू आहे सामान्य माणसांनी सिनेमागृहाच्या आसपास हि फिरकू नये हि विनंती. 

वर कोणी तरी चिनी कम हे ची विचारपूस केली चिनी सोडून सगळंच कमी असलेल्या या चित्रपटात अमिताभ ६५चा तब्बू ३५ची दोघांच प्रेम यावर तब्बूचे वडील परेश रावल यांचा लग्नासाठी नकार आणि हे सगळं मूर्खासारखं बघणारे आम्ही.

शुट आउट ऍट लोखंडवाला

माया डोळस ( विवेक ओबेरॉय ) हा नको तितका क्रूर दाखवला आहे सर्वात मोठ आश्चर्य म्हणजे तुषार कपूरला गुंडाच्या भूमिकेत दाखवल आहे. यात त्याचे संवाद म्हणजे समोरचाच माणूस तुषार कपूरला दोन कानफटात मारून भाईगिरी शिकवेल अस वाटत होत.

पायरेटस ऑफ द कॅरिबियन ३

काय गोंधळ आहे कळलाच नाही तरी जॉनी डेपच्या भूमिकेमुळे पैसे फुकट गेले असे वाटले नाही नेमका हाच चित्रपट मित्राच्या पेश्यावर बघितला बाकी ३००रु फुकट.

 या सगळ्यात मिशन च्यांपियन चुकला याच फार वाईट वाटत पेपराच्या कुठल्या तरी टोकाला त्याची जाहिरात फार शोधल्या नंतर दुसऱ्या दिवशी मिळाली.