लेख आवडला.
इथले टॅक्सीवाले फार प्रेमाने वागतात असं वाटलं.
याचे कारण बहुधा टॅक्सी सोडून दुसरा कोणताही पब्लिक ट्रान्सपोर्ट (सार्वजनिक वाहतूकव्यवस्था) नसणे हे असावे. (कतारबद्दल माहित नाही परंतु काही वर्षांपूर्वी अमिरातीत तरी असा प्रकार होता.) या टॅक्सीवाल्यांना गिऱ्हाईकाशी अदबीने बोलणे भाग असते कारण दुसरी कोणतीही वाहतूकव्यवस्था नसल्याने या टॅक्सीवाल्याची एखाद्या गिऱ्हाईकाने केलेली तक्रार त्याला अतिशय महागात पडू शकते.
तसे, अनेक टॅक्सीवाले केवळ पाकिस्तानीच नसून अफगाणी पठाण असतात आणि अफगाणी लोकांना हिंदूंबद्दल जरा अधिक प्रेम असते हे मलाही जाणवले आहे. याचे एक प्रमुख कारण हिंदी चित्रपट आणि त्याबद्दल या लोकांना अतीव आकर्षण आहे याची कधी कल्पना आली का तुम्हाला?