1. मराठीत सेवा मागितल्यास प्राधान्य देण्यात येईल अशा पाट्या सर्व खाजगी व्यवसायात लावाव्यात व अमलात आणाव्यात.
  2. अमराठी लोकांना मराठी भूमीत मराठी होण्यास योग्या वातावरण निर्माण करावे.
  3. अमराठी माणसाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे काम अगदी प्रेमाने व त्वरित करावे उदा. आरक्षण नसताना हॉटेल मध्ये वगैरे टेबल देणे.
  4. मराठीत बोलल्यास वेटर, रिक्शावाला, धोबी, भाजीवाला, दूधवाला इ. लोकांना ५% टीप द्यायचा पायंडा पाडावा.

असे केल्याने सध्या महाराष्ट्रात जे पर प्रांतियांचे जे अतिक्रमण होत आहे, ते वाढीस लागेल. मराठीतून बोलल्या मुळे जर असे आर्थिक लाभ व्हावयास लागले, तर पर प्रांतियांचे चांगलेच फ़ावेल.