असे केल्याने सध्या महाराष्ट्रात जे पर प्रांतियांचे जे अतिक्रमण होत आहे, ते वाढीस लागेल. मराठीतून बोलल्या मुळे जर असे आर्थिक लाभ व्हावयास लागले, तर पर प्रांतियांचे चांगलेच फ़ावेल.
महाराष्ट्रात दुकानदारी करणारे फक्त सिंधी, गुजराथी, मारवाडी आणि सरदारजी मराठी बोलतात. हिंदी भाषक मराठी कधीही शिकणार नाहीत. ते मराठीला नोकरांची भाषा समजून तुच्छ लेखतात. एक वेळ दक्षिणी भारतीय मराठी शिकतील, पण उत्तर भारतीय शिकणार नाहीत. त्यामुळे ज्यांना मराठीचे प्रेम नाही असे परप्रांतीय केवळ आर्थिक फायदा होतो म्हणून मराठी बोलणार नाहीत. हा माझा अनेक वर्षांचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांचे इथे फावेल अशी भीती बाळगण्याचे कारण नाही.
किशोर कुमारने मराठीतला च आणि ळ उच्चारता येत नाही म्हणून एकही मराठी गाणे म्हटले नाही! मुंबईत अनेक वर्षे राहणाऱ्या सिनेनटांना मराठीचा गंधही नसतो.