कोहम साहेब,
लेख एकदम आवडला. आपल्या/परक्या लोकांचं आपलेपण,"कुकरच्या रिंगसारखी रिंग घातलेला अरब",आणि मराठी बोलणारा अरब पाहून तुमचा बोबडी वळलेला चेहरा सगळंच आवडलं. तुम्ही त्याच्या डोक्यावरच्या रिंगबद्दल लिफ्टमध्ये सहकाऱ्याशी बोलला नसाल म्हणजे बरं, नाहीतर.... :-) विनोद आणि भावनांचा (आता हे कोण?)सुरेख मेळ घातला आहे. छान!
ता.क. आपल्या देशात आल्यावर कोरडेपणा जाणवतो हे खरं.इथे, लिफ्टमध्ये एखादा अनोळखी माणूसही लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहून"हेलो, किती थंडी आहे ना आज ?"असं बोलतो. पण मुंबईच्या ऑफिसात मी मख्खपणे जाणारे लोक पाहिले आहेत. एकदा दोनदा मी एक स्माईल पण दिलं,उत्तर नाही. :-( मग कळलं की आपण भारतात परत आलोय.
-अनामिका.