हे किशोरकुमारचेच गाणे आहे असे वाटते. शिवाय किशोरकुमार गांगुली हे बंगालीभाषिक आहेत हिंदी भाषिक नाहीत.
मात्र
पण उत्तर भारतीय शिकणार नाहीत. त्यामुळे ज्यांना मराठीचे प्रेम नाही असे
परप्रांतीय केवळ आर्थिक फायदा होतो म्हणून मराठी बोलणार नाहीत.
या मुद्द्याशी सहमत.
एक वैयक्तिक अनुभव म्हणजे काही हिंदी सहकाऱ्यांनी "सारस्वत बँक" चा उच्चार सारस्वत बंक असा करुन वर मराठीमध्ये कसे हास्यास्पद उच्चार आहेत हे शेरे मारले होते. त्यांना हिंदीतील हँसना आणि मराठीमधील बँक यामधला फरक समजावून सांगताना नाकी नऊ आले. पण शेवटपर्यंत बँकचा उच्चार बेंक असाच कसा योग्य आहे व मराठी कशी दरिद्री भाषा आहे हे शेरे ऐकत बसावे लागले.
मुंबईत अनेक वर्षे राहणाऱ्या सिनेनटांना मराठीचा गंधही नसतो.
याच मुद्द्यावर दुसऱ्या ठिकाणी झालेल्या चर्चेतही एक उदाहरण दिले होते. महाराष्ट्र सरकारच्या मराठी चित्रपट सोहळ्यामध्ये यश चोप्रांनापुरस्कार देण्याचे काय कारण आहे? त्यांनी किती मराठी चित्रपट निर्माण, दिग्दर्शित किंवा प्रदर्शित केले आहेत? शिवाय महाराष्ट्र हीमाझी कर्मभूमी आहे. मी महाराष्ट्रात-मुंबईत ५० वर्षे राहतो असे अभिमानाने सांगणाऱ्या या महाशयांना पन्नास वर्षे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार स्वीकारताना मराठीत भाषण करता येत नाही का?