प्रतिभा ताई,

तमचे वडे तेलात विरघळण्याचे ऐकून सखेद आश्चर्य वाटले.  डाळ वाटताना त्यात अगदी पाणी घालता कामा नये.  सैल पीठ वाटले असण्याची शक्यता वाटते. 

 कृतीमधला तो भाग इथे उद्धृत करीत आहे.:::
भिजलेली उडदाची डाळ, मिरच्या, आल्याचे तुकडे, जिरे असे सर्व जिन्नस, पाणी न घालता, चांगले घट्ट वाटून घ्या. [रगडा, पाटा-वरवंटा, एकजीवक (ब्लेंडर/मिक्सर), अन्नप्रक्रीयक (फूडप्रोसेसर) यापैकी जे साधन आपल्या सोईचे असेल त्याच्या सहाय्याने करावे. महत्वाचा मुद्दा म्हणजे रवाळ पण घट्ट, एकजीव वाटले गेले पाहिजे.]

समजा अशी परिस्थिति निर्माण झाली तर उरलेल्या वाटलेल्या पिठात उडिदाच्या डाळीचे (कोरडे) पीठ मिसळावे.  त्याने वडे तेलात विरघळणार नाहीत.  जास्त कोरडे पीथ घातलेत तर वडे हलके होणार नाहीत.

इतर कोणाला या पाककृतीचा काही अनुभव आला का?

कलोअ,
सुभाष