उदाहरणादाखल स्वयपाक घरातील चाकूचा विचार करु. चाकुने भाजी चिरता येते तसेच कोणाच्या पोटात खुपसुन त्याला मारताही येते. त्यावर उपाय म्हणून चाकू वापरणे आपण थांबवत नाही तर त्याचे टोक बोथट करतो. म्हणजे पोटात खुपसता येऊ नये अशी आपण त्याची रचना करतो. जुनी म्हण आहे 'कां न सदन बांधावे, पुढे बिळे करील घूस' थोडक्यात तंत्रज्ञान जास्तीत जास्त सुरक्षित करणे हाच त्यावर ऊपाय आहे. तंत्रज्ञानाचा वापर थांबणे हा नव्हे.
त्याच बरोबर गुन्हेगारांचे प्रबोधन हे ही आवश्यक आहे. त्याचा कितपत परिणाम होतो हे पहाण्यापेक्षा त्याचा केंव्हा न केंव्हा परिणाम होईल अशी आशा करत राहणे एवढेच आपल्या हातात आहे.