मराठीत एक जुना मराठी चित्रपट आहे भाऊबीज नावाचा (त्यात सुलोचना नायिका आहे, असे वाटते). मी हा चित्रपट पाहिलेला नाही; मात्र त्यातले

सोनियाच्या ताटी
उजळल्या ज्योती
ओवाळिते भाऊराया रे
वेड्या बहिणीची वेडी रे माया

हे गाणे दिवाळीत नेहमी दूरदर्शनवर दाखवत, ते पाहिलेले आहे. अतिशय गोड चालीचे हे गाणे आहे. ह्या चित्रपटाचे संगीतकार मला वाटते दत्ताराम होते. (चू. भू. द्या. घ्या.) मराठीचित्रपटांना संगीत देण्याबद्दल दत्तारामांनी काही विचार , अनुभव सांगितले का? ह्या चित्रपटातली आणखी काही गाणी लोकप्रिय झाली होती का?

१. (नंतर अनेक वर्षांनी आलेल्या यहाँ वहाँ सारे जहाँमें तेरा राज है ... ह्या गाण्याची चाल अशीच आहे असे वाटते.)