मी मनोगतीला हि तोच प्रश्न विचारू इच्छितो अविनाश भोसलेंची श्रीमंती आपल्याला खुपतेय की त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग ?
मला अविनाश भोसले यांची श्रीमंती खुपत नाहीये. श्रीमंतीचा मार्ग जर अवैध असेल तर खुपतो आहे.
अविनाश भोसले हे त्यांच्या आयात कर चुकवण्याच्या प्रकारामुळे प्रकाशात आले आहेत, त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी व्हावी, दोषी असल्यास नियमाप्रमाणे शिक्षा अथवा नसल्यास सुटका व्हावी; प्रसारमाध्यमांनी प्रकरणाबद्दलची माहिती व तपासाची गती, दिशा, तपासातील गैरव्यवहार वैगेरे समाजासमोर मांडावेत, अविनाश भोसले यांना परस्पर दोषी किंवा निर्दोष ठरवू नये.