गुरू आवडला नाही ठिक आहे (मी पाह्यला नाही आणि ऐश्वर्या ला सहन करण्याची माझ्यात ताकद नाही) पण मणिरत्नम ला नवशिक्या म्हणण्याइतके किंवा मणिरत्नम माहितच नसण्याइतके इग्नोरंट असायचे असेल तर एकुणातच चित्रपटांवर अधिकारवाणीने बोलूही नये हो! अंजली, दलपती, रोजा, बॉंबे, थिरूडा थिरूडा असे सुंदर सिनेमे त्यानेच दिलेत. जरा आयएमडीबी वर जाऊन बघा त्याची माहिती.
इंडस्ट्रीकडून चांगल्या कामाची अपेक्षा इत्यादी म्हणताना प्रेक्षक म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे हे विसरू नये. तुम्ही चार सिनेमे नाकारताय पण लोक त्याच सिनेमांसाठी वेडे झालेत ना. मग निर्माते तेवढेच करणार.