१५जगभरातल्या मोठ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या मी पाह्यलेल्या चित्रपटांची यादी करणं हे मलाही अवघड नाहीये. त्या प्रदर्शनाची गरज नाही. क्राफ्ट आणि पॅशन इत्यादी लेक्चरची इथे काहीच गरज नाही तेव्हा तेही केवळ एक प्रदर्शन असं म्हणायला हरकत नाही.

गुरू मी पाह्यलेला नाही आणि पाहाणारही नाही तेव्हा त्याबद्दल मी काहीच म्हणणार नाही.

पण आता एवढी सगळी यादी माहित असलेल्या माणसाने मणिरत्नम हा कोणी नवशिका आहे का? असं विचारणं अजूनच हास्यास्पद वाटायला लागलंय. बेनेगलांचेच झुबेदा आणि नेताजी बघितले तर त्यांच्याबद्दलही शंका घ्याव्या लागतील. मणिरत्नम हा दिग्दर्शक म्हणून गुरूदत्त यांच्या किती जवळपास जातो किंवा नाही हाच मुद्दा असेल तर तुमचे अरूण खोपकर किंवा केतन मेहता ही जात नाहीत हो. रायझिंग सारखा विनोदी सिनेमा काही वेगळं सांगत नाही. मुद्दा एवढाच आहे कि मणिरत्नम हा दिग्दर्शक म्हणून जगातला महान दिग्दर्शक जरी नसला तरी आपल्याला फिल्ममेकिंगमधले खूप कळतं किंवा खूप पाह्यलंय असा आव आणणाऱ्या माणसाला मणिरत्नम माहितच नसण्याला इग्नोरन्स सोडून कुठलेही कारण योग्य वाटत नाही.

>>पण त्याचे 'काहीतरी वेगळे देतो' अशा अर्थाने नाव खूप झाले आहे, हे माहिती आहे. 'इंडस्ट्रीकडून अपेक्षा...' हा माझ्या प्रतिसादातला भाग ह्या संदर्भात होता.<<
या वाक्यांना काही रेलेव्हन्स मला तरी मिळत नाहीये.  १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ज्या दिग्दर्शकाचे नाव मोठे आहे त्याला तुम्ही नवशिका म्हणता. मला हा माणूस माहित नाही असं म्हणता. मग तो अरूण खोपकर आणि केतन मेहता यांच्या तुलनेत कुठे आहे असंही म्हणता...  आणि मग इंडस्ट्रीकडून अपेक्षा म्हणून काहीतरी म्हणता... केतन मेहता रायझिंगच्या धरतीवरच चित्रपट करणार असतील तर सगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना वाईट दिवस आलेत असंही म्हणता येईल..

तुम्हाला दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळणार नाही हे उघडच आहे. प्रेक्षकांची काही जबाबदारी असते हे कसं कळणार तुम्हाला! कुणालाच आवडत नाहीत आपल्या बाजूचे दोष दाखवलेले. मनमोहन देसाई, यश चोप्रा आणि तत्सम सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे तुम्हीच असता. त्यांना वाट्टेल तेवढा धंदा मिळवून देणारे तुम्ही एनारायच असता. आणि 'श्वास' बघण्यासाठी $१० चे तिकिट काढायला कांकूं करणारे एनारायच असतात. पण अर्थात तुम्ही अरूण खोपकर वाले तेव्हा तुम्हाला ते बरोबरच वाटेल...