१५जगभरातल्या मोठ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या मी पाह्यलेल्या चित्रपटांची यादी करणं हे मलाही अवघड नाहीये. त्या प्रदर्शनाची गरज नाही.

मी आपल्या सिनेमासंबंधीच्या ज्ञानाविषयी कसलीही शंका व्यक्त केलेली नाही. आपण तशी ती केलीत, व का तर मी मनिऱत्नमसंबधित काही विधाने केली म्हणून. तेव्हा मी ही जी नावे दिली, ती एव्हढ्यासाठी की ह्या सगळ्या चांगल्या सिनेमाच्या पसाऱ्यात मणीरत्नम कुठे बसतो, हे मलातरी माहीत नाही. आपणाला असे वाटते का की जगातल्या सिनेमावर त्याचा काही जाणवण्याएव्हढा ठसा आहे म्हणून?

क्राफ्ट आणि पॅशन इत्यादी लेक्चरची इथे काहीच गरज नाही तेव्हा तेही केवळ एक प्रदर्शन असं म्हणायला हरकत नाही.

ह्यावर काय म्हणणार? पण अशा तऱ्हेने जर कुणी काही मत मांडले, व ते 'प्रदर्शन' म्हणून उडवायचे असले तर चर्चा होऊ शकत नाही.

पण आता एवढी सगळी यादी माहित असलेल्या माणसाने मणिरत्नम हा कोणी नवशिका आहे का? असं विचारणं अजूनच हास्यास्पद वाटायला लागलंय.

मी मणिरत्नमला 'नवशिका' असे कुठे म्हटले आहे? उलट इतका बोलबाला (तामिळ व हिंदी चित्रपटसृष्टीत) झालेला, म्हणून तर हे सर्व लिहिले!

मणिरत्नम हा दिग्दर्शक म्हणून गुरूदत्त यांच्या किती जवळपास जातो किंवा नाही हाच मुद्दा असेल तर तुमचे अरूण खोपकर किंवा केतन मेहता ही जात नाहीत हो.

मी अरुण खोपकर किंवा केतन मेहता ह्यांची नावे मणिरत्नमच्या संदर्भात घेतली नव्हती. मला सिनेमाची थोडीफार जाण जी आली, त्यात कुणाची मदत मला झाली, इतपत त्यांचा संदर्भ होता. त्यांच्यावर आपण वारंवार उगाच घसरत आहात! आपण मी काय लिहिले आहे, ते एक्दा परत नीट वाचावे. 

बेनेगलांचेच झुबेदा आणि नेताजी बघितले तर त्यांच्याबद्दलही शंका घ्याव्या लागतील

मान्य. झुबेदा हा अत्यंत वाईट चित्रपट होता. नेताजी बघितला नाही. पण त्याआधी बेनेगलने 'अंकुर', 'निशांत', वगैरे बऱ्याच चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

या वाक्यांना काही रेलेव्हन्स मला तरी मिळत नाहीये. १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ज्या दिग्दर्शकाचे नाव मोठे आहे त्याला तुम्ही नवशिका म्हणता. मला हा माणूस माहित नाही असं म्हणता. मग तो अरूण खोपकर आणि केतन मेहता यांच्या तुलनेत कुठे आहे असंही म्हणता... आणि मग इंडस्ट्रीकडून अपेक्षा म्हणून काहीतरी म्हणता...

रेलेव्हन्स मिळणार कसा? आपण रागावून वाचताहात, रागावून लिहिताहात! नवशिका: वर लिहिल्याप्रमाणे. अरुण व केतनचे उल्लेख: वर लिहिल्याप्रमाणे. आणि मी कुठेही अरुण खोपकर व केतन मेहता ह्यांची तुलना मणिरत्नमबरोबर केलेली नाही. मला त्यांचा व इतर अशाच काही व्यक्तिंकडून सिनेमाची जाण मिळाली, ती तीन दशकांपूर्वी! 

मनमोहन देसाई, यश चोप्रा आणि तत्सम सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे तुम्हीच असता. त्यांना वाट्टेल तेवढा धंदा मिळवून देणारे तुम्ही एनारायच असता. आणि 'श्वास' बघण्यासाठी $१० चे तिकिट काढायला कांकूं करणारे एनारायच असतात. पण अर्थात तुम्ही अरूण खोपकर वाले तेव्हा तुम्हाला ते बरोबरच वाटेल...

इथे तर तुम्ही खूपच घसरलाहात! एन. रार. आय. काय, 'अरुण खोपकरवाले' (म्हणजे नक्की काय?) काय, 'श्वास' काय (संदर्भ लागत नाही). ह्या रँबलिंगला मी सोडून देतो!