काय चर्चा असेल ती गुन्हा वा गुन्हेगार याविषयी असावी.

एका मराठीला वाहिलेल्या संकेतस्थाळावर तरी या घटनेवर संबंधित व्यक्ति मराठी आहे म्हणून चर्चा करणे मला अप्रस्तुत वाटते. प्रसारमाध्यमे काहीही लिहोत, इथे नको. एका मराठी माणसाची संपत्ती मनोगतींना खुपत असेल असे आपल्याला का वाटते?  माझापेक्षा श्रीमंत असे अनेक मनोगती आहेत, म्हणून ते मला का खुपावेत?

<मी मनोगतीला हि तोच प्रश्न विचारू इच्छितो अविनाश भोसलेंची श्रीमंती आपल्याला खुपतेय की त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग ? > असे विचारून आपण मनोगतींना क्षुद्र मनोवृत्तीचे तर ठरवू पाहत नाही ना?

जर तसे नसेल तर आपला या प्रश्नामागील उद्देश स्पष्ट करा म्हणजे गैरसमज असल्यास तो दूर होइल.