प्रदीपराव, मी विविध भारती लिसनर्स या याहू वरील गटाचा सदस्य आहे. ई मेल ने त्याचा जो खुराक रोज येतो त्यात आजच मी आजके फनकार या कार्यक्रमात सादर झालेला दत्ताराम यांच्यावरील अंकाचे लिखाण वाचले. ते अतिशय त्रोटक होते आणि त्यात दत्तारामांच्या परवरिश चा उल्लेख नव्हता. तसेच त्यांच्या मृत्यू चा ही उल्लेख नव्हता. या पार्श्वभूमीवर तुमचा हा लेख आजच दुपारी वाचायला मिळाला आणि कलेजा खुश होउन गेला. अत्यंत सविस्तर आणि सुंदर लेखाबद्दल अभिनंदन ! विनायकरावांनी आपल्या प्रतिक्रियेत जसे भाउबीज च्या गाण्यांचे दुवे दिले आहेत तसे तुम्ही दत्तारामांनी संगीत दिलेल्या किंवा वाजवलेल्या गाण्यांचे दुवे दिले असते तर लेख वाचता वाचता ती गाणी ऐकण्याची मजा आली असती.
विविध भारती चा अत्यंत रसिक आणि उत्साही उदघोषक आहे युनूस खान. त्याचा ब्लॉग आहे रेडिओवाणी नावाचा. तो अवश्य पहा. त्यात तो गीतकार संगीतकारांवर खूप खोल अशी आणि चांगली माहिती देत असतो. सोबत अर्थातच त्या त्या गाण्यांचे दृष्य आणि श्राव्य असे दुवे असतातच.