१.काय चर्चा असेल ती गुन्हा वा गुन्हेगार याविषयी असावी.
अविनाश भोसले प्रकरणात भरपूर प्रश्न निर्माण झाले आहेत.
२.एका मराठीला वाहिलेल्या संकेतस्थळावर तरी या घटनेवर संबंधित व्यक्ती मराठी आहे म्हणून चर्चा करणे मला अप्रस्तुत वाटते.
अस का ? मराठी माणसे मराठी माणसांचे पाय खेचतात अस भरपूर चर्चेत भरपूर प्रतिसादात मनोगतीमध्येच आढळून येईल.
३.प्रसारमाध्यमे काहीही लिहोत, इथे नको.
मनोगत हे काही वेगळं नाही मराठी माणसाशीच संबंधित आहे.त्यामुळे मराठी माणसांचे गुणदोष त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा इतर माध्यम सोडून आपल्यामध्येच मोकळ्या पणे मांडल्या जाव्यात हि अपेक्षा.
४.<मी मनोगतीला हि तोच प्रश्न विचारू इच्छितो अविनाश भोसलेंची श्रीमंती आपल्याला खुपतेय की त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग ? > असे विचारून आपण मनोगतींना क्षुद्र मनोवृत्तीचे तर ठरवू पाहत नाही ना?
नाही तसं नाही पण हा प्रश्न हि तितकाच महत्त्वाचा आहे. का राज ठाकरेंनी कोहिनूर मिलची जागा विकत घेतल्यावर एवढी चर्चा होते, सचिन तेंडुलकराचे खेळणे घसरल्यावर जाहिरात बंद करण्याच्या मागण्या होतात.असो किती तरी अमराठी व्यक्तींनी मुंबईत भरपूर प्रकारचे कर चुकवले असतील ( बॉलीवूडमधल्या )त्यांच्या विरुध मराठी वर्तमान पत्रात एवढी चर्चा का होत नाही.का फक्त मराठी माणसांनीच नीतिमत्ता जपण्याची आवश्यकात आहे.ती इतक्या वर्ष जपली आहे म्हणूनच हे नाव इतकं गाजत आहे.
मी हि चर्चा करण्या अगोदर महाराष्ट्र कर्ज मुक्त हवा या विषयात गणेश नाईक यांचे प्रताप लिहिले आहेत या माणसाने एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असेल तर अविनाश भोसले बाबतीत काय. मराठी माणूस म्हणून जर यांना पाठीशी घातलं तर मुंबईच काय होईल आणि ह्यांच्या पेश्याच्या हव्यासापोटी पायदळी तुडवल्या जाणाऱ्या गरीब माणसांचं काय होईल.
मला वाटत प्रश्न अविनाश भोसलेंच्या श्रीमंतीचा नाही मराठी माणसांच्या दुष्टीकोनाचा आहे कर चुकवून हि आपला बॉलीवूडचा हिरो हिरोच राहतो आणि अविनाश भोसले............