धन्यवाद महेश.

मूळ रचनेच्या

तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप तुम घना साया

ह्या पहिल्या द्विपदीचे गण असे पडतील-
राधिका, राधिका, यमाचा, गा
किंवा
राधिका, राधिका, लगा, सरला

हे जातीचा अंगाने जाणारे अक्षरगणवृत्त म्हणता येईल. कारण अनेक ठिकाणी दोन लघूंचा एक गुरू झाला आहे.  ह्या वृत्ताचे नाव माहिती नाही. पुढे-मागे कळले की सांगीनच. केलेला प्रयत्नही समछंदी म्हणता येईल. जिथे शब्दश: भाषांतर हास्यास्पद किंवा क्लिष्ट होत होते तिथे आकलनानुसार, समजानुसार अनुवाद केला आहे.

हे वृत्त उर्दू (आणि मराठीही) गझलकारांत तसे बरेच लोकप्रिय आहे. ग़ालिबच्या काही अत्यंत प्रसिद्ध गझला-- जसे  इब्ने-मरियम हुआ करे कोई, दर्दमिन्नतकशे दवा न हुआ किंवा कोई उम्मीदबर नहीं आती--  ह्याच वृत्तात आहेत. सुरेश भटांच्या राहिले रे अजून श्वास किती किंवा गीत आसावले तुझ्यासाठी ह्या दोन प्रसिद्ध गझलाही ह्याच वृत्तातल्या. मनोगतावरही ह्या वृत्तातल्या एक दोन गझला  आहेत असे वाटते.

अशी भाषांतरे सहज झाल्यास अजून देईन.