>>दिग्दर्शक मणिरत्नम म्हणून कुणीतरी आहे, <<
>>हे असे मणिरत्नम महाशय जर अलिकडचे यशस्वी होतकरू वगैरे दिग्दर्शक असतील,<<
ही आपलीच वाक्ये आहेत. यामधे तुम्हाला मणिरत्नम माहीत नाही आणि तुमच्या मते तो नवशिका असावा एवढाच अर्थ निघतो. बाकी मग तुम्ही जी काही कारणे देताय तेही रॅंबलिंगच म्हणता येईल.
सिनेमा करण्यासाठी पैसा लागतो आणि रिकव्हरी कशी असू शकते यावर सिनेमाचे बजेट ठरते. फिल्ममेकरला स्वतःचे घरही चालवायचे असते. नोकरी सांभाळून तो हे करत नाही. तेव्हा पैशाची गणितं महत्वाची ठरतात. आणि त्या जोरावर जेव्हा डिस्ट्रीब्युटर्स आणि निर्माते क्रिएटीव्ह प्रोसेस डिक्टेट करायला लागतात तेव्हा फिल्ममेकरचे हात अनेकदा बांधलेले असतात. कलेक्शनचे आकडे तोंडावर फेकून त्यांना गप्प केले जाते.
कितीही बकवास फिल्म असली तरी एनाराय लोकच तुमच्या यश चोप्रा, करण जोहर यांना उचलून धरतात. कितीही तिकिट असले तरी. त्यामुळे भिकारातले भिकार सिनेमे धंदा करतात. आणि तसेच दळण घालणाऱ्यांचे फावते. याउलट 'श्वास' सारख्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला, जिथे दिग्दर्शक स्वतः उपस्थित होता अश्या स्क्रिनिंगला तिकिट काढताना याच लोकांनी कूचकूच केली होती हा अनुभव आहे. इथे प्रेक्षकांच्या जबाबदारीचा प्रश्न येतो. जे तुमच्यासाठी गैरसोयीचे असल्याने तुम्हाला रॅंबलिंग वाटते आहे.
आणि हो तुम्ही ज्यांची नावे आदराने घेताय त्यांनीही वाईट फिल्म्स केलेल्या आहेतच तर मग मणिरत्नमलाच होतकरू म्हणण्यात काय अर्थ आहे? त्याने काही उत्तम पण लोकप्रिय फिल्म्स केल्यात म्हणून? त्याच्या काही फिल्म्स मधे कलात्मकता असूनही त्यांनी धंदा चांगला केला म्हणून?
अरूण खोपकरांच्या कॅंपमधल्या काहींची ज्याला त्याला कमी लेखण्याची वृत्ती अनुभवलेली आहे. आणि जे यशस्वी, जे लोकप्रिय, जे सर्वांना समजेल ते वाईट हे म्हणण्याची स्युडो इंटुक वृत्तीही अनुभवली आहे. तेव्हा श्वास बद्दल काय मत असेल त्या कंपूमधे ह्याची श्वास चे उदाहरण सांगताना मला उत्तम कल्पना आहे. तेव्हा घसरण्याबद्दल आपण बोलू नये.
स्वतःचा इग्नोरन्स लपवायची इतकी गरज काय हे काही कळले नाही.