मराठी भाषे प्रमाणेच अरबी भाषेतही कित्येक नविन गोष्टी, ज्या त्यांच्या संस्कृतीत पूर्वी नव्हत्या त्या, आल्या पण त्यांनी त्या त्या गोष्टींना, वस्तूंना अरबी प्रतिशब्द वापरून प्रचलीत केले. तेच आज सर्वत्र (ओमानी) अरबी भाषेत वापरले जातात.

उदा.
फुटबॉल = फुरत् अल् कदम
मोटरसायकल = दर्राजा नहारिया
सिग्नल, इंडिकेटर = इशारा
मोटरकार = सय्यारा
तेल      = झेत् (आपण ऑइल हा शब्द तेल शब्दापेक्षा जास्त वापरतो)
बटर      = झुब्दा.
मायोनेझ  = झेतून
हॉट सॉस = दाकोस
हॉट डॉग = मकानाक
हॉट डॉग ब्रेड = समून

असे बरेच शब्द आहेत. वापरात येतात तेंव्हा, खरच अरबांचं कौतुक करावसं वाटतं.

मराठीत, मोबाइल फोनला, 'भ्रमणध्वनी' हा शब्द अगदी चपखल वाटतो. मला खूप आवडतो.