मी ज्या गुरु ह्य मणिच्या फ़िल्मबद्दल लिहीले, ती तुम्ही पाहिलीही नाही. त्यामुळे ती कशी आहे, हे तुम्हाला माहिती नाही. पण तरी तुम्ही आवेशाने मी त्या फ़िल्मला व तिच्या दिग्दर्शकाला वाईट म्हटले म्हणून तुटून पडला आहात!
मी जर स्वैर विधाने केली असती तर तुम्हाला त्याबद्दल विचारला आले असते. पण मी गुरु चित्रपटातली काही उदाहरणे दिली होती. व जेव्हा तुमचा पहिला प्रतिसाद आला, तेव्हा मी प्रामाणिकपणे माझे म्हणणे काय आहे, ते जास्त विशद करण्याचा प्रयत्न केला. त्याला तुम्ही 'लेक्चरींग' म्हणून उडवून लावलेत. कारण त्याविषयी तुम्हाला काहीही प्रतिवाद करता येत नव्हता, हे उघड आहे!
सिनेमा करण्यासाठी पैसा लागतो आणि रिकव्हरी कशी असू शकते यावर सिनेमाचे बजेट ठरते. फिल्ममेकरला स्वतःचे घरही चालवायचे असते. नोकरी सांभाळून तो हे करत नाही. तेव्हा पैशाची गणितं महत्वाची ठरतात. आणि त्या जोरावर जेव्हा डिस्ट्रीब्युटर्स आणि निर्माते क्रिएटीव्ह प्रोसेस डिक्टेट करायला लागतात तेव्हा फिल्ममेकरचे हात अनेकदा बांधलेले असतात. कलेक्शनचे आकडे तोंडावर फेकून त्यांना गप्प केले जाते.
आणि हो तुम्ही ज्यांची नावे आदराने घेताय त्यांनीही वाईट फिल्म्स केलेल्या आहेतच तर मग मणिरत्नमलाच होतकरू म्हणण्यात काय अर्थ आहे? त्याने काही उत्तम पण लोकप्रिय फिल्म्स केल्यात म्हणून? त्याच्या काही फिल्म्स मधे कलात्मकता असूनही त्यांनी धंदा चांगला केला म्हणून?
आता तुमच्याच स्टाईलमध्ये ह्याला 'लेक्चरींग व प्रदर्शन' म्हटले तर?
श्याम बेनेगलने झुबेदा नावाचा अत्यंत वाईट चित्रपट बनवला, हे मान्य करण्याला मला कसलीही लाज वाटत नाही. आणि आता तुम्हीही 'मणी चांगला आहे, पण.....' असे म्हणून तुमच्या सुरुवातीच्या हाय ग्राउंडवरून खाली उतरत आहात! '...'उत्तम पण लोकप्रिय फिल्म्स केल्यात...' असतील की! मी गुरुबद्दल बोलत होतो. व जसे मी झुबेदा वाईट आहे, असे म्हणतो, तसेच गुरुही वाईट आहे, असेच म्हणणार. धंद्याची गणिते आहेत, म्हणून तडजोड ठीक आहे, त्यात वाईट काय? पण मग 'मणी म्हणजे कुणीतरी असा, की त्याचे सिनेमातले कर्तृत्व ज्याला माहीत नाही, त्याने सिनेमाबद्दल बोलूच नये', हे कशाला? आणि (इथे तुमची आकलनशक्ति तुम्हाला मदत करणार नाही बहुतेक), माझा मुख्य आक्षेप गुरुमध्ये जान नाही, आतून तो एकदम पोकळ आहे ह्याला होता. त्यात त्याने गाणी का घातली, नाच का घातले, ऐश्वर्या रॉयला का घेतले, हे मुद्दे मी मांडलेले नाहीत.
ह्याअगोदर तुम्हाला मी, मणी व अरुण खोपकर ह्यांची तुलना करतोय असा भास झाला होत! वास्तविक ह्या सर्व 'चर्चेत' खोपकरांना उगाच घिसडले जात आहे! त्यांना मी भेटून अथवा त्यांच्याशी कसलाही संपर्क होऊन आता बरोबर ३० वर्षे उलटून गेली आहेत. मध्यंतरी त्यांनी ' नारायण सुर्वे" व 'र. धों. कर्वे' अशा दोन डॉकुमेंटारीस् बनवल्याचे वाचले होते. आता ते कसलातरी कँप चालवत आहेत, असे तुमच्याकडून कळले, तेव्हा पुढील मुंबईभेटीत मी त्यांना भेटून त्याबद्दल माहिती काढेन!
सिनेमाच्या जगात जर कुणाला मणिरत्नमबद्दल माहित नसेल, तर तो 'इग्नोरंट' ठरतो, ही हास्यापद रँट तुम्ही चालू ठेवा हवे तर. मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. तसेच अरुण खोपकरांचा एक कुठचातरी कँप आहे, व त्यातील माणसे स्युडो इंटलेक्ट आहेत असे म्हटल्यानेही अथवा 'तुम्हा एन. आर. आय.' मुळे हे सगळे झाले आहे, असे म्हटल्यानेही. ह्या सगळ्या प्रतिसादातून तुम्ही मात्र स्वतःच्या उद्धटपणाचे व कमी आकलनशक्तिचे प्रदर्शन करत आहात. आणि 'तुम्ही एन. आर. आय' वगैरे म्हणून फ्र्स्ट्रेशनचेही!