मला वाटतं संदर्भादाखल दिलेल्या लेखांचा तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.
सर्वसामान्य लोकांच्या हक्काची संपत्ती बळकावल्यामुळे त्याच्याबद्दल प्रसारमाध्यमांनी रान उठवणे योग्यच आहे. तसे सगळेच कंत्राटदार थोड्याफार प्रमाणात दोषी असू शकतात पण जितका मोठा गुन्हा तितकी अधिक चर्चा ह्या न्यायाने अविनाश भोसलेला हा "मान" मिळाला आहे. शिवाय अविनाश भोसलेला पकडण्याची कारणे राजकीय असण्याची शक्यता लोकप्रभा मधल्या लेखात सांगितली आहेच.
का फक्त मराठी माणसांनीच नीतिमत्ता जपण्याची आवश्यकात आहे.
कारण राज ठाकरे, सचिन तेंडुलकर हे मराठी माणसांचे मानबिंदू आहेत आणि ते भ्रष्ट होताना दिसले की निराश लोकांची त्यांच्यावर आगपाखड होणारच. अमराठी लोकांबद्दल आपुलकीचं नसते.
अविनाश भोसले तसा सामान्यांना (आतापर्यंत) अपरिचित असल्याने त्याच्याबद्दल काही खुपतंय अस मला नाही वाटत. वाटत असेल तर फक्त आश्चर्यच आणि हे सगळं कसं जमलं असेल याबद्दल कुतूहल...