सर्वप्रथम तोंड सांभाळून बोला. तुम्ही कोणीही असलात आणि कितीही मोठे असलात तरी आकलनशक्ती वा निरर्थक बडबड असले शब्द माझ्याबद्दल उच्चारायचा तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाही.
>>मी त्या फ़िल्मला व तिच्या दिग्दर्शकाला वाईट म्हटले म्हणून तुटून पडला आहात! <<
आता इथे तुमची आकलनशक्ती मलाही काढता येईल. मणिरत्नमला वा गुरू सिनेमाला वाईट म्हणल्याबद्दल मी 'तुटून पडले' नाहीये. (परत एकदा तोंड सांभाळून बोला. मी अजून एकाही अपशब्दाचा वापर केला नाही याचा अर्थ मला अपशब्द माहित नाहीत असे नाही.) मणिरत्नम माहित नसणं किंवा त्याला होतकरू म्हणणं याचं जे समर्थन तुम्ही चालवलंय त्याला आक्षेप आहे. पण तुम्हाला ते समजण्याची इच्छाच नाहीये त्यामुळे तुम्ही वैयक्तिक चिखलफेकीचा आधार घेतात आणि परत घसरण्याची भाषा करताय.
>>ह्याअगोदर तुम्हाला मी, मणी व अरुण खोपकर ह्यांची तुलना करतोय असा भास झाला होत!<<
हे तर अजून विनोदी होतंय. >>ह्या साऱ्यांच्या तुलनेत मणिरत्नम कुठे राहतो? माझ्या पेशाच्या निमित्तने, सुदैवाने मला भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या काही चांगल्या मंडळींचा सहवास लाभला. अरुण खोपकर, केतन मेहता हे त्यातली दोन ठळक नावे. त्यांच्याबरोबर राहूनही थोडेकाही शिकता आले.<< या तुमच्याच वाक्यावरून हे उघड आहे की तुमच्यामते अरूण खोपकर, केतन मेहता हे ग्रेट आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही मणिरत्नम ला होतकरूही म्हणले आहेत. तेव्हा मला भास बिस होण्याचा मुद्दा इथे येत नाही.
यश चोप्रा, जोहर, मनमोहन देसाई यांची नावे तुम्ही काढलीत. मी केवळ गणितं काय आहेत ते सांगितलं. तुमच्यासारखं स्वतःच्या इग्नोरन्सचं समर्थन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपटांची, फिल्ममेकर्सची यादी आणि कोणाकोणाच्या ओळखी नाही फेकल्या तोंडावर.
>>सिनेमाच्या जगात जर कुणाला मणिरत्नमबद्दल माहित नसेल, तर तो 'इग्नोरंट' ठरतो, ही हास्यापद रँट तुम्ही चालू ठेवा हवे तर.<<
भारतीय सिनेमाच्या इतिहासामधे नावाचा उल्लेख व्हावा इतपत काम मणिरत्नमने केलं आहे त्यामुळे माझे म्हणणे हे रँट वा हास्यास्पद नाहीच अर्थात तुम्ही तसेच म्हणणार कारण तुम्हाला स्वतःचे समर्थन करायचे आहे आणि दुसऱ्याची आकलनशक्ती काढून आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायचे आहे.
कॅंप चा अर्थ न कळण्याइतके इनोसंट तुम्ही आहात हे कुणालाही खरे वाटणार नाहीये तेव्हा तुमच्या त्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. आणि त्या कंपूतली स्युडो इंटुक माणसे मी पाह्यली आहेत. अनुभवली आहेत. तुम्हाला काहिच अधिकार नाही माझा अनुभव खोटा म्हणण्याचा.
दुसरं असं धंद्याचं गणित ते श्वास बद्दल एनाराय लोकांनी दाखवलेली 'आस्था' याबद्दल मी जे सांगतेय ते माझ्या स्वतःच्या अनुभवातलं आहे. आणि एक उदाहरण म्हणून मी तो अनुभव इथे घेतलेला आहे. एनाराय म्हणणं म्हणजे माझं फ्रस्ट्रेशन असं म्हणून तुम्हाला माझं आयुष्य जज करायचा अधिकार कोणी दिला? काय माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल? का केवळ मी भारतात आहे याचं कारण मला बाहेरच्या जगात प्रयत्न करूनही जॉब मिळत नाहीये आणि त्यामुळे मी जेलस आहे अशी जनरली प्रत्येक एनाराय ची भारतातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल असते तशी समजूत तुम्ही बोलून दाखवताय?
>>ह्या सगळ्या प्रतिसादातून तुम्ही मात्र स्वतःच्या उद्धटपणाचे व कमी आकलनशक्तिचे प्रदर्शन करत आहात. आणि 'तुम्ही एन. आर. आय' वगैरे म्हणून फ्र्स्ट्रेशनचेही!<<
तोंड सांभाळून बोला. वाकडे शब्द तुम्ही वापरलेत. स्वतःच्या कॉंटॅक्टसचे प्रदर्शन तुम्ही केलेत. आणि केवळ तुम्ही वयाने कदाचित मोठे असाल म्हणून तुम्हाला मला उद्धट म्हणायचा अधिकार पोचतो असे जर तुमचे मत असेल तर विसरा. हे असलं काहीही कारण नसताना तुमच्याकडून ऐकून घ्यायला मी तुमचं कुठलंही देणं लागत नाही.