ही चर्चा तुम्ही कशी घडवलीत ते नीट एकदा वाचा जरा.
मी मणिच्या गुरुबद्दल व त्यानिमित्तने त्याच्या एकंदरीत सिनेमाचसंबंधीत स्थानाबद्दल लिहिले, तेव्हा तुम्ही प्रथम माझी हे सर्व लिहायचा अधिकार काय, वगैरे प्रश्न विचारलेत. मी जे काही त्या चित्रपटासंबंधी लिहिले त्याबद्दल एक अक्षर आपण ना लिहिलेत, ना माझ्याकडून ऐकून घेतलेत (प्रदर्शन, लेक्चर हे शब्द तुम्ही वापरलेत, त्याला सर्वसाधारण माणसे उद्धट म्हणतात).
......ह्या साऱ्यांच्या तुलनेत मणिरत्नम कुठे राहतो? माझ्या पेशाच्या निमित्तने, सुदैवाने मला भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या काही चांगल्या मंडळींचा सहवास लाभला. अरुण खोपकर, केतन मेहता हे त्यातली दोन ठळक नावे. त्यांच्याबरोबर राहूनही थोडेकाही शिकता आले.
ह्या वाक्यात जर आपणाला मी खोपकर व मणी ह्यांची तुलना करतो आहे असे वाटले, तर मी परत तेच म्हणेन-- आपली आकलनशक्ति कमी आहे! इथे तुलना मणी आणि अगोदर जी नावे लिहिली ती 'हे सारे' ह्यांची आहे, हे उघड आहे. पुढील वाक्ये माझ्याबद्दलची आहेत! इथे कुणाही सुजाण वाचकाचा काहीही गैरसमज होऊ नये!
....आणि त्या कंपूतली स्युडो इंटुक माणसे मी पाह्यली आहेत. अनुभवली आहेत. तुम्हाला काहिच अधिकार नाही माझा अनुभव खोटा म्हणण्याचा.
मी गुरु व मणी ह्यांच्याबद्दल जी विधाने केली होती, त्याबद्दल कुणी माझा असे लिहायचा अधिकार काढला? नीट चर्चा करायची असती, तर कुणी मला मी जे काही म्हणतो आहे, त्याचे समर्थन करायला सांगितले असते, नीट वाचले असते, नीट उत्तरे दिली असती. ह्यातील तुम्ही काय केलेत? माझा अधिकार विचारलात. तुमची ही चर्चा खरे म्हणजे मणीच्या गुरुबद्दल न राहता माझ्याबद्दल सुरू झाली! जेव्हा मी काही मी पाहिलेल्या चित्रपटांची नावे दिली, तेव्हा 'खोटा व प्रदर्शनी' कुणी कुणाला म्हटले? हे वाचा आपण लिहिलेले:
१५जगभरातल्या मोठ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या मी पाह्यलेल्या चित्रपटांची यादी करणं हे मलाही अवघड नाहीये. त्या प्रदर्शनाची गरज नाही. क्राफ्ट आणि पॅशन इत्यादी लेक्चरची इथे काहीच गरज नाही तेव्हा तेही केवळ एक प्रदर्शन असं म्हणायला हरकत नाही.
सिनेमाबद्दलची माझी समज विचारण्यात आली, तेव्हा मी जे सांगितले, तेव्हा '१५जगभरातल्या मोठ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या मी पाह्यलेल्या चित्रपटांची यादी करणं हे मलाही अवघड नाहीये. त्या प्रदर्शनाची गरज नाही.' हे त्यावर म्हणणे, ही आपल्या मते दुसऱ्यावर अविश्वास दाखवणे होत नाही काय?
परत जेव्हा मी काही जास्त विशद करायला गेलो, तेव्हा तुम्ही तेही लेक्चर व प्रदर्शन म्हणून निकालात काढलेत.
मग तुम्ही मी त्यांची ओळख सांगितली ह्यावरून अरुण खोपकरांवर घसरलात. त्याचा मणिशी काहीही संबंध नव्हता. तसेच लिहिण्याच्या भरात मी जेव्हा हे म्हटले की रोजा आला तेव्हा मी देशंतर केले, तेव्हापासून तुम्ही 'तुम्ही एन. आर. आय.' हे सुरू केलेत. हे वाचा परत एकदा:
मनमोहन देसाई, यश चोप्रा आणि तत्सम सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे तुम्हीच असता. त्यांना वाट्टेल तेवढा धंदा मिळवून देणारे तुम्ही एनारायच असता. आणि 'श्वास' बघण्यासाठी $१० चे तिकिट काढायला कांकूं करणारे एनारायच असतात. पण अर्थात तुम्ही अरूण खोपकर वाले तेव्हा तुम्हाला ते बरोबरच वाटेल...
माझाही हाच प्रश्न आहे, तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे की तुम्ही मला 'अरुण खोपकर कँपवाले', 'श्वासची तिकिटे न घेणारे' वगैरे म्हणता? तुम्ही जर अशी सरसकट विधाने करून पुढे जात असाल, तर मीही ती करणार आहे, हे लक्षात ठेवा.
तोंड सांभाळून बोला. वाकडे शब्द तुम्ही वापरलेत. स्वतःच्या कॉंटॅक्टसचे प्रदर्शन तुम्ही केलेत. आणि केवळ तुम्ही वयाने कदाचित मोठे असाल म्हणून तुम्हाला मला उद्धट म्हणायचा अधिकार पोचतो असे जर तुमचे मत असेल तर विसरा. हे असलं काहीही कारण नसताना तुमच्याकडून ऐकून घ्यायला मी तुमचं कुठलंही देणं लागत नाही.
मी कुठेही तुमच्याकडून किंचीतही साध्या कर्टसीचीही अपेक्षा आता करत नाही आहे. वरील सर्व चर्चा नीट वाचा-- मी माझ्या ह्याअगोदरच्या "नीट वाचा' ह्या प्रतिसादापर्यंत अगदी शांतपणे तुम्ही जे जे वेडेवाकडे लिहिले (वर दाखवलेले), ते सर्व सहन केले. मी वयावगैरेची तशीच कसल्याही काँटॅक्टस वगैरे दाखवून कुणाचाही आदर मिळवण्याचा प्रत्यत्न केलेला नाही, इथेही तो तसा मी करत नाही.
(काही भाग संपादित : प्रशासक)