मी गेली २० वर्षे नागपुरात आहे पण माझ्या वाचण्यात/ऐकण्यात वरील शब्द आले नव्हते. गि वाले शब्द मात्र नेहमी कामवाल्या बायकांच्या तोंडून ऐकले आहेत.  हिंदी शब्दांचा वापर तर असतोच  पण हिंदीच भाषांतर मराठीत करून बोलतात. मी लिहून राहिले होते ना तेव्हा मला बरेच शब्द आठवून राहिले होते. विदर्भातल्या लोकांना वस्तु भेटते व व्यक्ति मिळते. आज भाजीवाल्याकडे सांबार भेटलाच न्हाई आणि शुभाकडे गेले तर ती मिळालीच न्हाई! शब्दसुचीच्या प्रतीक्षेत....