मी सुद्धा नागपुरामध्ये ८ वर्ष असल्यामुळे काही वेगळे शब्द ऐकताना आणि वापरताना बघितले आहे.

माझे असे निरीक्षण आहे की लोक जसे समजतात तशी वैदर्भीय मराठी हिंदी मिश्रीत नाही. उलट पुण्यामुंबईपेक्षा चांगली मराठी ऐकण्याचे समाधान मात्र तेथे मिळाले.

माझीही काही भर, ज्येष्ठ व्यक्तीला बावाजी असे म्हणतात. गुडघ्याला टोंगळा, कोणी मनासारखे बोलले तर सही असा प्रतिसाद मिळतो. झोपण्यासाठी लेटणे असेही ऐकलेले आठवते.