आमच्या इमारतीत घडलेला.
एक मुलगी वय वर्षे ३ - साडे तीन.
आई, माझी आजी कुठे आहे?
आजी देवाकडे गेली बाळा.
देवाकडे का गेली?
माणसे म्हातारी झाली की ती देवाकडे जातात.
(काही दिवसांनी मुलीच्या बालवाडीच्या प्रवेशद्वारावर मुलगी आणि तिच्या वर्गमित्राच्या आजीतील संवाद)
अनिकेतच्या आजी तुम्ही म्हाताऱ्या झाला का?
हो गं बाळा! आता मी म्हातारीच झालीये.
मग तुम्ही देवाकडे कधी जाणार??