मीरा,
तुमचा लेख अतिशय सुंदर आहे. सर्वानी स्तुती केलेलीच आहे.
लेखाच्या शिर्षक वाचुन गंमत वाटली. गणित आणि मौज. ( तुम्ही अनेक वचन वापरता आहात, मौजा.).
दुदैवाने, आम्हाला अतिशय विद्वान असे प्राध्यापक लाभले होते. त्यांचा सुर नेहमी असा असे "कि सोडवुन दाखवा", " परीक्षेत मी काढलेल्या प्रश्नपत्रिकेत उतीर्ण झालात तरी भरपुर". त्यामुळे गणिताविषयी अढी नसली तरी प्रेमही कधी निर्माण झाले नाही.
कालांतराने, नारळीकरांच्या कथा वाचुन गणितज्ञ सुध्दा माणसेच असतात आणि त्यांच्यातही रसिकता आणि लालित्य असते हे लक्षात आले.
तुम्हाला विनंती आहे, असेच लेख लिहीत जा. इतंराच्या मनातील नसलेला रस तुम्ही निर्माण करु शकाल असा विश्वास वाटतो. 
द्वारकानाथ