छन्न म्हणजे झाकलेले असे वाटते. प्रच्छन्न हा शब्द मराठीत ऐकला आहे परंतु छन्न हा शब्द ऐकला नव्हता, बहुधा संस्कृतात वापर असावा. तसेही झाकलेले, गुप्त राखलेले, लपवलेले यासारखे सामान्य आणि सर्व थरातील मराठी भाषकांना समजतील असे सर्वसामान्य शब्द असताना "छन्न" शब्दाचे प्रयोजन समजले नाही. (बराचवेळ मी तो छत्र म्हणूनही वाचला आणि याचा अर्थ काय असा विचारही केला, कोणा इतराने तो छन्न आहे असे सांगेपर्यंत.)