छन्न म्हणजे झाकलेला ली ले ले ल्या ली (कॉरिडॉर साठी छन्नमार्ग हा शब्द प्रचलित असल्याचे तुम्हाला ठाऊक असेल)
संस्कृत कर्म भू धा वि. वापरण्याचा एक फायदा असा की तो वरच्या सर्व रूपांसाठी एकच वापरता येतो. मनोगतावर छन्न हा शब्द अनेक ठिकाणी अनेक रूपांत वापरायचा असल्यामुळे काय निवडावा असा प्रश्न होता तो कर्म भू धा वि वापरून सोडवलेला आहे.
त्र आणि न्न मध्ये फरक कमी दिसतो हा दोष मुद्रासंकल्पनाचा आहे. मुद्रासंकल्पन बदलणे हे अशक्य नसले तरी (सध्या) अवघड आणि वेळखाऊ आहे. पण त्यावर एक सोपा उपाय आहे. तो शब्द 'छन्न' असा वापरून पाहण्याचा विचार आहे.
छत्र आणि छन्न हे शब्द एकाच (झाकणे अशा अर्थी) कुठल्यातरी धातूपासून उगम पावलेले असावेत, असे वाटते.
तुमच्या स्वारस्याबद्दल धन्यवाद.