सॅलड सँडविच बनविताना तसे काही ठोक नियम नाहीत. आपापल्या आवडी-निवडीनुसार त्यातील घडकांची मात्रा कमी जास्त करता येते.
मला खालील प्रमाणे आवडते:-
हिरव्या चटणीत थोडा पुदीना आणि माफक लसूण असावा. नारळ नसावा. थोडे लिंबू पिळावे किंवा किंचित चिंच घालावी. चटणी तिखटजाळ असावी.
बाकी घटकांत काकडी जास्त, त्या खालोखाल टोमॅटो, त्याहून कमी उकडलेला बटाटा, अगदी एक चकती कांदा घालावा.
भाज्यांचा प्रत्येक थर लावल्यावर मिरपूड भूरभूरावी, सर्वात शेवटी टोमॅटो केचप आणि चवीनुसर मिठ भूरभूरुन सँडविच बंद करावे.
सँडविच मध्ये बीटरूट मला आवडत नाही. त्याने गोडसर चव येते.