झांबळ झांबळ करणे ला झामल झामल करणे आणि भणभण करणे ला बावन बावन करणे ही म्हणतात. नागपुरात प्रत्येक चांगल्या, उत्तम, उदात्त, भरपूर गोष्टीमागे बम लावायची प्रथा आहे. जसे बम मजा आली, बम माल, बम धुतलं/सुतलं वगैरे. इथे पुण्यात मूर्ख, बावळट ह्या अर्थाचे बह्याड, भैताड हे वैदर्भीय शब्द बरेच दिवसात वापरलेले नाहीत. पुण्यात बधीर हा शब्द एकेकाळी फार चलनात होता. तशी माणसे सगळीकडे सारखीच असतात. पण विदर्भातली माणसे अघळपघळ आणि प्रेमळ आहेत. तूर्तास एवढेच.