समस्त कोकणस्थांची क्षमा मागून महाजालावर सापडलेला दुसरा विनोद.
एक पत्रकार एका कोकणस्थाची मुलाखत घेत असतो.
पत्रकार विचारतो, "अहो मला सांगा, तुम्हाला सगळे जण चिंगूस का म्हणतात?"
कोकणस्थ सांगतो,"अरे, आता हे बघ माझं हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्षं वापरतो. अजून पाच वर्षांनी ते पूर्ण फाटेल. मग त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी, मग ती गोधडी फाटली की त्याचे लंगोट करीन, मग ते लंगोट फाटले की त्याची पायपुसणी करीन, मग पायपुसणी वापरुन फाटली की त्याच्या वाती वळून पणतीमध्ये लावीन आणि वाती जळून जी राख उरेन त्या राखेने मी दात घासीन."
पत्रकार बेशुद्ध.