अश्याच प्रकारचा आणखी एक विनोद आठवला !
एकाच इमारती मध्ये राहत असलेल्या नेनें च्या मुलाचे लेलें च्या मुली बरोबर प्रेम-प्रकरण असते. नेनें च्या बरोबर खालच्या घरात लेले राहत असतात.
एकदा नेनें च्या घरातील सर्व लोक बाहेर जाणार असतात. एकांत मिळण्याची ही नामी संधी हेरून नेनें चा मुलगा लेलें च्या मुली ला सांगून ठेवतो की घरातील सर्व लोक बाहेर गेले रे गेले की मी आमच्या गॅलरीतून तुमच्या गॅलरीत एक रुपयाचे नाणे टाकेन. त्याचा आवाज झाला की तू काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पड आणि वर माझ्या घरी ये.
ठरल्या प्रमाणे नेनें चा मुलगा लेलेंच्या गॅलरीत एक रुपयाचे नाणे टाकतो आणि लेलेंच्या मुलीची वाट पाहत बसतो. एक तास होतो. २ तास होतात. तरी लेलें ची मुलगी काही वर येतच नाही. शेवटी नेनें च्या घरातील सर्व लोक घरी परततात.
नेनें चा मुलगा प्रचंड चिडतो. नंतर कधीतरी गाठ पडल्यावर नेनें चा मुलगा लेलें च्या मुलीला जाब विचारतो. तर मुलगी म्हणते "अरे, ते एक रुपयाचे नाणे कुठे पडले आहे ते मी ३ तास शोधत होते." यावर मुलगा म्हणतो "काय वेडा समजतेस की काय मला. अगं, मी ते नाणे दोऱ्याला बांधून खाली सोडले होते. काम झाल्यावर मी दोरा खेचून नाणे वर ओढून घेतले."