हिंदी गाण्यांचे ओढूनताणून मराठीकरण करणे गरजेचेच आहे काय? 'भेदी ते लुटून जाता' ही कसरत कशासाठी?
'किस्मत जिस में दुख ही भरे हो
दोष किसको देंगे हम
इस संसार में पराधीन है भाई भरत
संतान आदमीकी'
असले काहीतरी करत बसलो तर गदिमा आणि बाबुजींचे आत्मे तळतळल्याशिवाय रहातील काय? आधी आपला हा उपक्रम एका व्यक्तीविशेषाची 'टवाळ' की आहे असे वाटले होते, पण आता तर आपण गंभीरपणेच भाषांतरे करायला लागलात!
तेंव्हा कुंदनबाबूंच्या किंवा इतरांच्या आत्म्याला अधिक क्लेष देऊ नका. त्यापेक्षा स्वतंत्र रचना करा, विडंबने करा. आपली प्रतिभा नक्कीच तेवढी सक्षम आहे.