लॅपटॉप साठी 'मनोगत' वरील एका लिखाणात 'अंक उच्च' असा शब्द वापरला होता. 'मी माझा मांडीवर उघडला' हेच  पुरेसे विनोदी आहे. 'मी माझ्या अंक उच्चचा कळपट उघडला. बहुदा मातृफलकातच काहीतरी घोटाळा असावा' हे म्हणजे एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून महापूजा करत असल्याचे वर्णन वाटते. शाळेत शिकवताना तर ज्या वस्तूला भविष्यात आपण ज्या नावाने संबोधणार आहोत तेच नाव द्यावे असे मला वाटते.