बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे जर नवनवीन वस्तू आपल्या वापरात येत असतील तर त्यासाठी नवीन शब्द आल्याने भाषा अधिक समृद्धच होईल असे मला वाटते. हे नवीन शब्द संस्कृतजन्यच असावेत असा अट्टाहास धरणे निरर्थक आहे. कित्येक फारसी, हिंदी, कानडी शब्द घेऊन मराठी भाषा वाढलेली आहे. आता तिच्यात इंग्रजी, फ्रेंच किंवा चिनी, जपानी शब्दही येऊ द्यावेत. जसजसे जागतिकीकरण वाढत जाईल तसतसे ते झाल्याशिवाय राहणार नाही.