१. गुटखा, पान तंबाखू खाऊन मुखरसाची मारलेली पिचकारी आपल्या वर पडत नाही, कारण हे करणारा आपला सह प्रवासी असतो. आपल्याला ह्या कलेचे प्रात्यक्षिक मिळते.
२. कोणाचे कोणते ’पाखरु’ ह्या विभागणीत आपला वाटा आपसूकच मिळतो.
३. खिडकीत जागा मिळाल्यास रस्त्यावरची प्रेक्षणीय स्थळे बघण्याचा आनंद लुटता येतो.
४. ’गर्दीचा फायदा सर्वांना’ चुटपुटते स्पर्श सुख घेणारे प्रेमीयुगुल बघायला मिळतात.
५. राष्ट्रपती, पंतप्रधान, संत्र्या पासून मुख्यमंत्र्यां पर्यंत, बुश पासून परवेझ पर्यंत कोणाचे काय चुकते ह्याचे बहुमूल्य ज्ञान प्राप्त होते. ह्या लोकांनी खरेतर वेष पालटून प म ट ने प्रवास केल्यास त्यांना ह्या टीप्स फायद्याच्या होतील.
६. बसच्या पुढच्या भागात असल्यास आपल्या चालकाचा रस्त्या वरील चालकांचा संवाद किंवा त्याची नुसतीच केलेली शेरेबाजी आपल्या मराठीच्या (अप)शब्दकोशात मोलाची भर घालून जाईला.