पी.एम.टी. वाहक-चालकांना "बस स्टॉप ही बस थांबवण्याची जागा नसुन पी.एम.टी पाहण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी आहे." असं काहीस वाटत असावं.
आणि जर का उद्या पुणे-विद्येचे माहेरघर (?) म्हणुन पी.एम.टी ने काही आभ्यासक्रम राबविले तर ते काय असतील हा ही एक चर्चेचा मुद्दा ठरु शकतो.
उदा. मास्टर / बॅचलर / डिप्लोमा इन ऱॅश कम्युनिकेशन- बस क्रमांक-२९९-कात्रज भोसरी (मास्टर पदवी साठी सकाळी ९:३० ते ११.०० आणि संध्याकाळी ६:३० ते ८:०० या वेळेतली कोणतीही बस (बॅच) इ.)