म. टा. मधील या लेखाचे लेखक न्या. राजन कोचर यांची मराठी भाषेविषयीची कळकळ ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना निदर्शनास आली होती त्यासंबंधीची एक आठवण. इ‌. स. २००२ मध्ये रिझर्व बँकेतील कामाचा एक भाग म्हणून मुंबई उच्च न्यायालयातील न्या. राजन कोचर यांच्या न्यायालयात हजर राहण्याचा योग आला होता. जातपडताळणीनंतर नगरसेवकपद रद्द झालेल्या मुंबई महानगरपलिकेतील एका नगरसेवकाचा रिट अर्ज  न्या. राजन कोचर यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आला होता. महानगरपालिकेच्या [अमराठी] वकिलाने थोड्याश्या गुर्मीतच या संदर्भातील कागदपत्रे  मराठीत असल्याच्या व आपल्याला मराठी समजत नसल्याच्या सबबीखाली तारीख मागितली. तेंव्हा न्या. राजन कोचर यांनी त्याला फटकारले व बजावले की या राज्याची राजभाषा मराठी आहे; ती येत नसेल तर शिकायला पाहिजे आणि मराठी येत नाही ही सबब आपल्या कोर्टात या पुढे चालणार नाही.